स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार इंदोरकडून भिवंडीकडे धुळे मार्गे गुटख्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथक तैनात केले. सरवड फाट्याजवळ संबंधित गुटख्याने भरलेल्या ट्रकला पोलिसांनी अडवत चालकाला ट्रकमध्ये असलेल्या माला संदर्भात विचारपूस केली
तीस लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त
ट्रकचालक व वाहकातर्फे उडवा उडवीचे उत्तरे मिळाल्यानंतर संबंधित ट्रकची तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा पोलिसांना आढळून आला. या संपूर्ण मुद्देमालासह पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे. या कारवाई संदर्भातील माहिती पोलीस अधिक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
