शिरपूर - राष्ट्रीय फेरीवाला धाेरणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी रस्ते चाैकातील अतिक्रमण हटवण्याची माेहीम नगरपालिकेने हाती घेतली असून, शनिवारी सकाळी निमझरीनाका मेनराेड परिसरात नगरपालिका पाेलिसांच्या माेहिमेत किरकोळ विक्रीते साहित्य जप्त करण्यात आले विशेष म्हणजे, पूर्वसूचना नदेताच कारवाई झाल्याचा आराेप करीत विक्रेत्यांनी विराेध सुरू केल्यावर नगरपालिका पाेलिसांनी ताेडीस ताेड उत्तर देत अतिक्रमण काढून टाकले. या कारवाईमुळे बऱ्याच वेळ तणावाचे वातावरण हाेते करवंद नाका परिसरात नगरपालिका क्षेत्रातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली हाेती. मात्र रस्त्यावर विक्री करणाऱ्या हातगाडीवाल्यांसह किरकाेळ राजकीय दबावतंत्राचा वापर केल्याने विक्रेत्यांवर कारवाई केली नव्हती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, राष्ट्रीय फेरीवाला धाेरणानुसार विक्रेत्यांसाठी फेरीवाला झाेन तयार करण्याचे काम सुरू नव्हते. अशा परिस्थीतीत महत्त्वाचे रस्तेही माेकळे करणे गरजेचे असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी रिक्रीशन गार्डनसमोरीवरील विक्रेत्यांविराेधात कारवाई करण्यात अाली.
सकाळी १०.०० वाजता अचानक या परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू झाली. यावेळी स्वत: पोलिस निरीक्षक आगरकर, पोलिस कर्मचारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासकीय अधिकारी अधिकारी यांच्यासह बांधकाम विभागाचे अभियंता, माधवराव पाटील अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात हाेता. रस्त्यावर दुकान मांडलेल्या छोट्या विक्रेत्यांसह थेट रस्त्यापर्यंत बस्तान मांडलेल्या व्यावसायिकाच्या विरोधात कारवाई करत साहित्य जप्त करण्यात आले. निमझरीनाका येथून सुरू करण्यात आलेली कारवाई करवंद नाका, मेनरोड, रिक्रीशन गार्डनसमोरीवरील ठिकाणी राबविण्यात आली.
या मोहिमेत रस्त्यावरील हातगाड्या, दुकानाबाहेर ठेवण्यात अालेले वस्तू, साहित्य जप्त करण्यात आले. अचानक राबविण्यात आलेल्या या कारवाईने विक्रेत्यांची एकच धावपळ निर्माण झाली होती
अचानकझालेल्या कारवाईचा निषेध करत सामाजिक कार्यकर्ते आबासो ओंकार जाधव यांनी प्रशासकीय अधिकारी व पोलीस निरीक्षक आगरकर साहेब विभागीय अधिकारी यांना घेराव घातला. सर्वाच्च न्यालयाच्या निर्णयानुसार पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय विक्रेत्यांवर कारवाई करणे चुकीचे आहे. प्रशासनाकडून न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला जात असल्याच्या तक्रारी यावेळी हॉकर्स, टपरीधारक केल्या.अतिक्रमण निर्मूलनप्रसंगी
अतिक्रमण हटविण्यात आले दुकानदारांच्या समोर उपासमारीची वेळ आली आहे
सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानुसार राष्ट्रीय फेरीवाला धाेरण राबवले जात अाहे. या धाेरणांतर्गत प्रत्येक शहरात फेरीवाला, ना फेरीवाला प्रतिबंधीत फेरीवाला क्षेत्राची निर्मिती करण्यात अाली अाहे. शिरपूर नगरपालिका क्षेत्रात हजारांपेक्षा अधिक फेरीवाल्यांची नाेंद असून त्यांच्यासाठी अधिक फेरीवाला क्षेत्र विकसित झाले नाहीत . फेरीवाला समितीच्या मान्यतेनंतर शहरात विभागनिहाय फेरीवाला क्षेत्राबाबत निश्चित प्रतिबंधित केलेल्या जागांना . या क्षेत्राची अंमलबजावणी करण्यापुर्वी प्रत्येक विभागातील एक नमुना फेरीवाला क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत नाही म्हणून अशी परिस्थिती निर्माण होते.