नाशिक येथे गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांचा छापा

फुले शाहू आंबेडकर
0
शहरातील पंचवटी भागातील फुलेनगर परीसरातील तेलंगवाडी येथे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गावठी दारु अड्डयावर छापा मारुन हजारो रुपयांची दारु जप्त करत एकास ताब्यात घेतले आहे. तर एक गुन्हेगार पळून गेला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दारु नष्ट करण्यात आली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर संजय पवार (वय २४, रा. फ्लॅट नं ७१, पाचवा मजला, सम्राट अशोक नगर, फुलेनगर, पंचवटी, नाशिक) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून अनिल हनुमंत जाधव (रा. तेलंगवाडी, फुलेनगर पंचवटी, नाशिक) हा पोलीस येत असल्याची माहिती मिळाल्याने पळून जाण्यास यशस्वी झाला आहे. मात्र पोलीस  त्याचा शोध घेत आहे.
या छापा कारवाईत गावठी हातभटटीच्या तयार दारूने भरलेल्या २० लिटरच्या प्लास्टीकच्या ३ कॅन व १० लिटरच्या प्लास्टीकच्या ३ कॅन असे एकूण ६ प्लॅस्टीकच्या कॅन आणि त्यात एकूण ९० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारूने भरलेल्या ९,९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. तसेच जप्त केलेल्या मालाचे सॅम्पल घेवून त्या जागीच नष्ट करण्यात आले. एका किराणा दुकानाच्या बाजूला असलेल्या घराजवळ गल्लीतील मोकळया जागेत ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, दोन इसम गावठी हातभटटीची तयार दारू चोरटया मार्गाने विक्री करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट क्र. १ चे रामदास भडांगे, यांना मिळाली होती. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि चेतन श्रीवंत, भडांगे, सुरेश माळोदे, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, मोतीराम चव्हाण, गौरव खांडरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात  महाराष्ट्र दारू बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default