धारुर तालुक्यातील अल्पवयीन बहिणीला चुलत भावाने पळवले ; पोलिसांत गुन्हा नोंद

फुले शाहू आंबेडकर
0
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सख्ख्या चुलत भावाने अल्पवयीन सख्ख्या चुलत बहिणीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारूर  तालुक्यातील एका गावातील दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन साडे सतरा वर्ष वयाची मुलगी ही अंबाजोगाई तालुक्यातील आणि युसुफवडगाव (ता. केज) पोलीस ठाण्याच्या हद्दीत मामाच्या गावी आजोळी आली होती. दि.31 मे रोजी अल्पवयीन मुलगी घरी आढळून आली नाही. याची माहिती मामाने मुलीच्या आई-वडिलांना फोनवरून दिली. तसेच मुलीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. 2) युसुफवडगाव पोलीस ठाण्यात मुलीला त्यांच्या सख्ख्या पुतण्याने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची तक्रार दिली.
या तक्रारीवरुन पोलिसांनी सख्ख्या चुलत भावानेच सख्ख्या चुलत बहिणीला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक PSI विलास तुपारे पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे चार महिन्यापूर्वी याच नराधम चुलत भावाने पळवून नेलेल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी धारुर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default