शिरपूर तालुका वंचित बहुजन आघाडी ची कार्यकारणी जाहीर

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर/प्रतिनिधी:  शासकीय विश्रामगृह शिरपूर येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक घेण्यात आली ,बैठकीत वंचित बहुजन आघाडी चे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यभर कार्यकारिणी गठित करण्यात येत असून ,जिल्हा लेवल पासून ते गावातील बूथ लेवल पर्यंत कार्यकारणी देण्याचे काम सध्या वंचित बहुजन आघाडि ने चालू केले आहे. येणाऱ्या काळात बहुजन वर्गातील छोटे छोटे जात समूह धनगर न्हावी कोळी माळी सुतार बेलदार लोहार होलार कुणबी मातंग मुस्लिम महार व इतर छोट्या छोट्या जात समूहातील सत्तेपासून वंचित असलेल्या ,आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या ,राजकीय लाभापासून वंचित असलेल्या, मूलभूत  सुविधांपासून वंचित असलेल्या ,त्या त्या जात  समूहातील प्रतिनिधींनी सत्तेत जाऊन आपला व आपल्या  समूहाचा उद्धार करण्यासाठी आपला सत्तेतील वाटा मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर झंझावात निर्माण करत आहेत.  वंचित समूहाने त्याचा लाभ करून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील होऊन वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करावीत.
 त्या अनुषंगाने आज शिरपूर येथे ही प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर व प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी साहेब तसेच धुळे जिल्हा प्रभारी दिशा पिंकी शेख यांच्या मार्गदर्शनानुसार शिरपूर येथे वंचित बहुजन आघाडी ची शिरपुर तालुका कार्यकारिणी गठित करण्यासाठी तालुका लेवल बैठक बोलविण्यात आली होती बैठकीस उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ ज्येष्ठ नेते राज साहेब चव्हाण जिल्हाध्यक्ष अरविंद निकम जिल्हा उपाध्यक्ष व शिरपूर तालुका प्रभारी विजय पाटील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुभाष पाटील इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनीश्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी असलेले कुठेही न बाटलेले तसेच वंचित बहुजन वर्गासाठी सतत झटणारे ओबीसी साठी आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे ,मुस्लिमांना पाच टक्‍के आरक्षण मिळावे अशी मागणी करणारे तसेच प्रत्येक वंचित घटक हा उपेक्षित राहू नये यासाठी झटणारे स्वाभिमानी नेते आहेत असे प्रतिपादन केले
या बैठकीत सर्वानुमते शिरपूर तालुका अध्यक्ष म्हणून विजय मरसाळे व शिरपूर तालुका महासचिव म्हणून रमेश ईशी उपाध्यक्ष महेश साळवे दिलीप बोरसे, गोटीराम पावरा ,राहुल बोरसे ,गोरक कोळी ,तर सचिव म्हणून जमादार भुवांसिंग ,रवी पेंढारकर, वनसिंग पावरा, दीपक पवार, छगन गायकवाड ,सहसचिव म्हणून सनी गवळी, तुषार बैसाणे, यांची तर प्रवक्ता म्हणून जितेंद्र पावरा यांची निवड करण्यात आली निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील कामासाठी हार्दिक शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default