तो आज प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या शिवाजी नगर येथील घरी गेला असता, यावेळी त्याच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. परिसरातील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली
जळगाव : शिवाजीनगर येथे २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
रविवार, मार्च २७, २०२२
0
जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको येथे प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नरेश आनंदा सोनवणे हा तरुण शहरातील फेडरेशन येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. तो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचे शिवाजी नगर हुडको येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते.
Tags
