प्रवीण दरेकरांची लोकल स्ट्रॅटर्जी
विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सुरुवातील ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भाजपने आता अपक्ष आमदारांना भेटण्याचा सपाटा लावला आहे. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन रवाना लोकलने प्रवास करत रवाना झाले आहेत.
सर्वच पक्षांनी अपक्ष आमदारांच्या भेटगाठी सुरू केल्या आहेत. प्रवीण दरेकर आणि भाजप नेते गिरीष महाजन यांनी आज वाहतूक कोंडीची अडचण होऊ नये, म्हणून विरारसाठी लोकलने प्रवास केला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी एक एक मत मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व आमदार गिरीश महाजन हे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला चर्चगेट स्टेशनहून लोकल ट्रेनने विरार करीता रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत सोबत आमदार मंगेश चव्हाणही आहेत.
