याप्रकरणी प्रतिभा इंगळे या महिलेनं अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये (Police) धाव घेवून तक्रार दिली आहे. याप्रकरणी फरिदाबाद येथील पुलकीत कपूरवर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिवसेंदिवस डोळ्यांचा आजार सातत्याने वाढत आहेत.अशात डोळ्यांच्या लेन्सच्या मागणीतही वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिभा इंगळे या महिलेनं लेन्सची एजन्सी घेतली. प्रतिभा लेन्स कार्ड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची एजन्सी घेण्याकरिता स्वतःच्या मोबाईलवरून गुगलवर सर्च केले.
त्यानंतर महिलेल्या फोनवर पुलकीत कपूर नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. मी कंपनीचा प्रतिनिधी बोलत आहे, आपल्याला कंपनीची फ्रॅंचाईजी देतो. त्यासाठी मशनरी, इंटिरिअर फर्निचर व सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आधीच पेमेंट करावा लागेल, असं कपूरने त्या महिलेला फोनवर सांगितलं. त्यानंतर प्रतिभाने पाच लाख, दहा लाख रुपयांचे वेगवेगळे व्यवहार करुन एकूण ४४ लाख १ हजार ८०० रुपये अकाऊंट मध्ये ट्रान्सफर केले.
