मनसेला शिंदे सरकारकडून १ मंत्रीपद मिळणार रामदास आठवले म्हणाले

फुले शाहू आंबेडकर
0
कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील पत्रकार परिषदेत आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सूत्रांकडून नवीन मंत्र्यांच्या शपथविधीची संभाव्य तारिख समोर आली. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपला किती खाती मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, मनसेला देखील एक मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले हे कल्याणात एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मनसेला देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे, असे विचारले. यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, 'मनसेला मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंधच नाही. मनसे हा निवडणुकीत आमच्यासोबत नसल्याने त्यांना मंत्रीपद देण्याचा प्रश्नच येत नाही. जर तसा विचार होत असेल, तर त्याचा विरोध करू'. आरपीआयचा मंत्रिमंडळात सहभाग असणार - रामदास आठवले राज्यात काही दिवसांपूर्वीच शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता काही दिवसातच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला देखील १ मंत्री पद मिळेल, अशी आशा केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default