देहली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्पाचे काम जवळपास 40 वर्षानंतर पूर्ण झाले आहे. यंदा पहिल्याच वर्षी गळाभरणीचे काम पूर्ण करून पाण्याची अडवणूक केली आहे. देहली मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळीची 189.60 मीटरची नोंद झाली आहे. प्रकल्पाची महत्तम पूर पातळी 200.50 मीटर असून हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होण्याचीही शक्यता असल्याने देहली नदीकाठावरील रायसिंगपूर, पुर्नवसन आंबाबारी, जुना नांगरमुथा,नवा नांगरमुथा, घोटपाडा, कोराई, खापर, रांझणी, घुनसी, लालपुरा,वल्ली,कोराई तसेच उखळसाग, भोयरा, सोनपाटी, कोयलीविहिर, खटकुवा, पोहरा, गंगापुर, घंटाणी, वाकाधामन, अंकुशविहीर, कंकाळी या कालव्यावरील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यात जवळपास चाळीस वर्षानंतर देहली प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. या गावाजवळील खेड्या पाड्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु, देहली प्रकल्प झाल्यानंतर मुसळधार पावसामुळं पहिल्यांदाच अंबाबारी गांव पाण्याखाली गेले आहे. तसेच दसरापादर गावातही पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हाधिकारी मैयंक घोष यांनी देहली प्रकल्पाची पाहणी केली आहे. धरण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सामाजिक कार्यकर्ते नागेश पाडवी यांनीही देहली प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आहे. देहली काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये.नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे,अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default