धुळे महापालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेनेचे आंदोलन

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : धुळे शहरातील समस्‍या, खड्डेमय रस्‍ते तसेच २२ लाखाचा रस्‍ता चोरी या मुद्यांवर शिवसेनेने आज आक्रमक भुमिका घेतली. या विरोधात धुळे महापालिकेसमोर आंदोलन करत आयुक्‍तांना घेराव घातला
शहरातील कॉलनी परिसरात तसेच मनपा हद्दवाढीतील 11 गावांमधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव  व अगामी काळातील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खड्डेमय रस्त्यांची युध्दपातळीवर डागडूजी करावी. तसेच 22 लाखांचा रस्ता चोरीप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आज जिल्हा शिवसेनेच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले, यासंदर्भात आयुक्त देविदास टेकाळे यांना घेराव देखील घालण्यात आला असून आयुक्तांना याबाबदचे निवेदन देण्यात आले आहे.

प्रशासना विरोधात घोषणाबाजी

आंदोलनावेळी महानगरपालिका प्रशासनातर्फे रस्त्यांसंदर्भात सुरू असलेला अनागोंदी कारोबारा विरोधामध्ये आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्याने परिसर दुमदुमून निघाला होता, मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे बघायला मिळाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default