नंदुरबार– खांडबारा रस्त्यावर बिजादेवी येथे ट्रॅक्टर व मोटारसायकलीचा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या दिलीप सुदाम देसाई (वय 39) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्याला 108 रुग्णवाहिकेने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अपघातात दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त ट्रॅक्टर रस्त्यावर उभे झाला दुसरा अपघात
सोमवार, सप्टेंबर २६, २०२२
0
नंदुरबार : नंदुरबार– खांडबारा रस्त्यावर बिजादेवी येथील हॉटेलजवळ ट्रॅक्टर आणि मोटरसायकलीचा अपघात झाला. यात एका युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेमध्ये आपघातग्रस्त ट्रॅक्टर तसेच उभे असल्याने त्याचा अंदाज न आल्याने मोटर सायकलस्वार त्यावर आदळून झालेल्या दुसऱ्या आपघतातही एकाचा मृत्यू झाला आहे. एकाच जागेवर दोन वेळा झालेल्या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले
Tags
