सांगली शहरात अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, अप्पा मलूगे याच्याजवळ ३ किलो गांजाचा साठा आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडून ३ किलो गांजासह त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ कायद्यातील तरतुदीनुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीत ३ किलोंचा गांजा जप्त; एका आरोपीला विश्रामबाग पोलिसांकडून अटक
सोमवार, सप्टेंबर २६, २०२२
0
सांगली: विश्रामबाग पोलिसांनी शहरातील नवीन वसाहतींमध्ये छापा मारुन ३ किलो गांजा जप्त करत एकाला अटक केली आहे. अप्पा मलूगे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४५ हजार किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अप्पा मलूगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Tags
