उत्कर्ष एकनाथ पाटील (वय वर्ष ३८) रा. मुंबई हे हिरडव येथील स्टेट बँकेच्या शाखेत सहाय्यक मॅनेजर म्हणून कार्यरत होते. दरम्यान काल सायंकाळी सारंगपूर शिवारातील एका शेतालगतच्या नाल्यामध्ये उत्कर्ष पाटील यांचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत कळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह व ताब्यात घेतला. यावेळी पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता मृतदेह आढळलेल्या नाल्यानजीकच्या शेतामध्ये रक्त लागलेले धारदार शस्त्र तसेच मृतकाचा एक बुट पडलेला दिसून आला. यावरुन पोलिसांनी अज्ञाताविरुध्द कलम ३०२, २०१ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
