चाळीसगावात रोगापेक्षा इलाज भारी...

फुले शाहू आंबेडकर
0
मुलावर डॉक्टरांनी चुकीचे ऑपरेशन केल्याचा वडिलांचा आरोप, रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची आरोग्य मंत्र्याकडे मागणी
चाळीसगाव शहरातील सर्वज्ञ हॉस्पिटलमध्ये एका १३ वर्षीय मुलावर अपेेन्डिस रोगावर चुकीचा उपचार व शस्त्रक्रिया  केल्याने, त्याची संडास व लघवी चक्क बंद होऊन, त्यांच्या ऑपरेशनच्या जागेवरुन निघाण्यास सुरुवात झाली. पुन्हा त्यांच्यावर ऑपरेशन करुन, आता त्याची संडास नैसर्गीकरित्या न होता महागडे बॅग व किट लावून होत असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. चाळीसगावातील रोगापेक्षा इलाज भारी..! या गंभीर प्रकाराची मुलांच्या वडिलांनी आरोग्य मंत्र्यासह संबंधीत विभागाकडे तक्रार केली असून डॉक्टरांच्या उपचार पद्धतीची सखोल चौकशी  करुन, परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, तालुक्यातील देविदास भावराव जाधव रा. सायगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, याच्या मुलगा जयेश देविदास जाधव (वय १३ ) यास पोटदुखीचा त्रास होत असल्याने, देविदास भावराव जाधव यांनी गावातील डॉ. डी. टी. पाटील यांच्याकडे दाखवले त्यांनी तपासून, तुमचा मुलाला चाळीसगाव शहरातील डॉ. हर्षल सोनवणे यांच्या राष्ट्रीय विद्यालय समोरील स्टेशन रोडस्थित सर्वज्ञ हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन जा असे सांगितल्यावर, देविदास जाधव यांनी जयेश यास डॉ. हर्षल सोनवणे यांच्या दवाखान्यात दिनांक १७/०८/२०२२ रोजी घेऊन गेले.
डॉक्टरांनी जयेशला तपासून तुमच्या अपेन्डिसचा त्रास आहे. त्यामुळे ऑपरेशन करावे लागेल असे सांगून व्यास ऍडमिट करून घेतले. त्यानंतर दिनांक १८/०८/२०२२ रोजी त्याचे ऑपरेशन (शस्रक्रिया) केले. ४ दिवस ऍडमिट ठेवल्यानंतर जयेशला घरी पाठवले आणि ९ दिवसानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दवाखान्यात येऊन टाके काढले, व घरी गेल्यानंतर दुसर्‍याच दिवशी जयेश यांचे काहीहि न खाता-पिता पोट फुगले. त्यामुळे देविदास जाधव घाबरून जाऊन त्यास लागलीच सर्वज्ञ हॉस्पिटल येथे घेऊन आले व डॉक्टरांनी पुन्हा जयेशला ऍडमिट केले. तसेच पुन्हा त्याचे छोटेशे ऑपरेशन करावे लागेल असे सांगून त्याच्या छातीच्या खाली बेंबीच्या खालपर्यंत जवळपास १८ टाक्यांचे दिनांक ३०/०८/२०२२ रोजी ऑपरेशन देविदास जाधव यांना कुठलीही पूर्वसूचना न देता केले.
जवळपास पंधरा दिवस ऍडमिट ठेवल्यावर जयशचा त्रास वाढत गेला. त्याची संडास व लघवी बंद होऊन त्याच्या ऑपरेशनच्या जागेवरून निघायला लागल्यावर डॉक्टर सोनवणे यांनी त्याच्या पोटात २ नळ्या टाकून संडास होण्यासाठी जागा केली. देविदास जाधव घाबरून गेले, त्यांनी डॉक्टरांना याबाबत जाब विचारले कि, माझ्या मुलाला किरकोळ अपेन्डिसचा त्रास होता. तुम्ही ऑपरेशन केल्यानतंर असे काय झाले कि, त्याचा त्रास वाढत गेला. आपण माझ्या मुलाचे चुकीचे ऑपरेशन केल्याचेस सांगीतल्यानतंर तसेच आम्ही पुढील उपचार दुसर्‍या दवाखान्यात करतो असे सांगितल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

मुलाचा त्रास जास्तच वाढत गेल्याने देविदास जाधव यांनी डॉक्टरांना वारंवार विनंती केली कि, तुम्ही चांगला उपचार करा, यावर त्यांनी तुमचे पेशंट ज्या ठिकाणी चांगली सुविधा मिळत असेल अश्या ठिकाणी घेऊन जा असा सल्ला डॉक्टरांनी दिला. जयेशवर डॉक्टरांनी चुकीचा उपचार केल्याने तो अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत असल्याचा आरोप देविदास भावराव जाधव यांनी तक्रारीत केला आहे.

पुढील उपचारासाठी मुलाला घोटी येथे एस. एम बी. टी. हॉस्पिटल येथे घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्याला २२ दिवस ऍडमिट करून त्याच्यावर उपचार केले. डॉ. सोनावणे यांच्या चुकीच्या उपचारामुळे मुलाचे शारीरिक नुकसान झाले व त्याला नैसर्गिक संडास न होता नळीला महागडे बॅग व किट लावून संडास होत आहे, शिवाय देविदास जाधव यांची आर्थिक परिस्थिती नसताना त्यांना लाखो रुपयांचा खर्च येऊन आताही खर्च चालूच, केवळ चुकीच्या उपचारामुळे कुटुंबाला आर्थिक व मानसिक त्रास झाला व होत आहे. चुकीचा उपचार करून देविदास भावराव जाधव यांच्या मुलाचे शारीरिक नुकसान करणार्‍या डॉ. सोनावणे यांच्या रुग्णालयाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी, व त्यांचा दवाखान्याचा परवाना रद्द करावा. असे न झाल्यास देविदास भावराव जाधव परिवार व रुग्ण मुलासह चाळीसगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशार देविदास जाधव यांनी निवेदनातून दिला आहे.

निवेदनाची प्रत आरोग्यमंत्री म. रा. मुंबई, जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव. जिल्हाधिकारी सो. जळगाव, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. जळगाव, तहसीलदार चाळीसगाव, तालुका आरोग्य अधिकारी चाळीसगाव, पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव यांच्याकडे रवाना केली आहे.

चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात एका सफाई कर्मचारी महिलेने रॅबीजचे इजेक्शन रुग्णास टोचल्याची घटना ताजी असताना, आता पुन्हा एक अल्पवयीन मुलावर खाजगी रुग्णालयात चुकीचे उपचार झाल्यामुळे तो जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. चाळीसगावातील रुग्णाबाबत असे गंभीर प्रकार घटत असतील, तर चाळीसगाव आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधी जाबबदारी तरी का? असा प्रश्‍न निर्माण होत असून, लोकप्रतिनिधीना मोठ्या-मोठ्या कार्यक्रमातून शहरासह ग्रामीण भागाच्या आरोग्य यंत्रणकडे लक्ष देण्यास वेळ मिळेल का? असा देखील प्रश्‍न उपस्थित होत असून या गंभीर प्रकाराची दखल घेवून, यातील सत्यता शोधून संंबंधीतांवर योग्य ती कारवाईच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मी गेल्या सहा महिन्यापूर्वी जयेशवर माझापरीने योग्य ते उपचार केले. संबंधीत रुग्णाच्या कुटूंबाने नतंर कुठल्याही प्रकारचा आमच्या रुग्णालय किवा माझाशी संपर्क केला नाही. तसेच नाशिक येथे मी त्यांना पुढील उपचारासाठी पाठविले होते. त्याठिकाणी देखील त्यांनी अर्धवट उपचार घेतल्याची माहिती मिळाली. जयेशवर कुठल्याही प्रकारचे चुकीचे उपचार झालेले नाहीत. माझ्याकडे चौकशीस असल्यास मी त्यांचा उपचाराबाबत माहिती देवून सहकार्य करेल.

डॉ.हर्षल सोनवणे, सर्वज्ञ हॉस्पिटल.

माझ्या अल्पवयीन मुलावर डॉ.हर्षल सोनवणे यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार व शस्त्रक्रिया केल्यामुळेच त्याची दयनीय अवस्था झाली आहे. डॉक्टारानी मुलगा तीन महिन्यात ठिक होईल असे सांगीतले होेते. तसेच घोटी येथे देखील त्यांनीच उपचारासाठी पाठविले होते. परंतू तेथे देखील मुलावर पूर्ण उपचार करण्यात आले नाहीत. चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळे त्याची संडास नैसर्गीकरित्या न होता महागडे बॅग व किट लावून होत. या संपूर्ण प्रकाराची चौकशी होवून आम्हाला न्याय मिळावा हिच अपेक्षा.

देविदास भावराव जाधव, तक्रारकर्ते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default