केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निकाल देत शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आहे. त्यानंतर शिंदे गटाने राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे. शिंदे गटाचे आमदार कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोश सुरू आहे.
निवडणुक आयोगाची लढाई जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी " हा सत्याचा, बाळासाहेबांचा आणि लोकशाहीचा विजय आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे..
"न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवणे हा सहानभुती मिळवण्याचा प्रकार आहे. निवडणूक आयोग न्याय व्यवस्था स्वांत्रत्र आहे, त्यावर आक्षेप आरोप घेवू शकत नाही. बहुमत आमच्याकडे आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने बहुमताच्या बाजूने निर्णय दिला असे म्हणत स्वतःमध्ये सुधारणा करा, आत्मचिंतन करा," असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या चोरांना हे पचणार नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. याबद्दल बोलताना त्यांनी "म्हणजे आम्ही ५० आमदार १३ खासदार चोर. असे म्हणत लाखो लोकांना चोर बनवतात आणि तुम्ही कोण?" असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला आहे
दरम्यान या निर्णयानंतर ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडून या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत
