अहमदनगर येथे धार्मिकस्थळी अल्पवयीन मुलींवर अत्याचार! तीन आरोपीस अटक; पोलिस ठाण्यावर निषेध आणि समर्थनार्थ मोर्चे

फुले शाहू आंबेडकर
0
सोनई-बेल्हेकरवाडी रस्त्यावर असलेल्या प्रार्थनास्थळात दोन महिन्यांपासून दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, महिलेचा विनयभंग याप्रकरणी तीन जणांवर गुरुवारी (ता.१५) मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

या सर्व आरोपीस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका समूहाने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काल आंदोलन केले, तर आज दुसऱ्या समूहाने दाखल झालेला गुन्हा चुकीचा असल्याचे सांगून पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला
एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम बळवंत वैरागर, संजय केरु वैरागर (रा. सोनई) व सुनील गुलाब गंगावणे (रा. अहमदनगर) या तिघांना गुरुवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. आरोपींनी आजार बरा करतो, म्हणून महिलेचा विनयभंग केला. दोन अल्पवयीन मुलीस बेल्हेकरवाडी रस्त्यावरील प्रार्थनास्थळात अनेकदा अत्याचार केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील, सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके व फौजदार सूरज मेढे यांनी गुरुवारी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन व फिर्यादीची कैफियत ऐकल्यानंतर गुन्हा दाखल करून सर्व आरोपीस अटक केली. डिसेंबर २०२३ ते १५ फेब्रुवारीपर्यंत आजार बरा करण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण होत असल्याचा फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपअधीक्षक पाटील रात्रीपासून सोनईत तळ ठोकून आहेत.

गुरुवारी झालेला प्रकार उघड होताच रात्री दोन तास एक समूह गुन्हा दाखल करावा, याकरिता तळ ठोकून होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. रात्री साडेबारा वाजता तीनही आरोपीस अटक केल्याचे समजल्यानंतर एका समूहाचे कार्यकर्ते शांत झाले.
शुक्रवारी सकाळी दुसरा समूहाने पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा आहे, असे त्यांच शुक्रवारी सकाळी दुसरा समूहाने पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा आहे, असे त्यांचे मत होते. सोनई-राहुरी रस्त्यावर व पोलिस ठाण्यासमोर गर्दीचा ओघ वाढू लागल्याने सकाळी दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी पाचारण करण्यात आली होती. प्रार्थनास्थळ, बसस्थानक, फिर्यादीचे घर व प्रमुख ठिकाणी बंदोबस्त व फिरती गस्त ठेवण्यात आली आहे.
आरोपीला नेवासे न्यायालयात नेताना जमावातील पन्नासहून अधिक मोटारी व मोटारसायकल मागे निघाल्याने कायदा व सुव्यस्था म्हणून सोनई, शिंगणापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तसेच दंगल नियंत्रण पथक बरोबर नेण्यात आले. तीन आरोपीस न्यायालयाने मंगळवार (ता. २०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default