११ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा अखेर गजाआड; २४ तासांत ठोकल्या बेड्या
शुक्रवार, मार्च २५, २०२२
0
पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेत ११ वर्षांच्या मुलीवर शाळेच्या स्वच्छ्तागृहात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. ही घटना बुधवारी सकाळी अकरा ते साडेअकरा या दरम्यान घडली होती. या प्रकरणी आरोपीला पकडण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. हा आरोपी शाळेचा सुरक्षारक्षक असल्याचे स्पष्ट झाले आहे.अटक करण्यात आलेला सुरक्षारक्षक हा पीडित मुलींच्या वडिलांना ओळखतो. तो पीडित मुलीशी बोलायला आला आणि त्याने जबरदस्तीने स्वच्छतागृहात नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. मंगेश असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.या घटनेचा तपास जलदगतीने व्हावा आणि आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जाव्या यासाठी पोलिसांठी एक पथक नेमले होते. या पथकाने योग्य दिशेने तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता ११ वर्षांची पीडित मुलगी जंगली महाराज रस्त्यावरील एका शाळेत शिकते. परवा बुधवारी (२३ मार्च) सकाळी ती शाळेत गेली असता या सुरक्षारक्षकाने तिच्याशी संवाद साधत तिला काही बहाणा करून ढकलत ढकलत शाळेच्या स्वच्छ्तागृहात नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचाराबाबत कोणाला कोणाला काही सांगितल्यास बघून घेईन अशी धमकीही त्याने पीडित मुलीला दिली होती. या घटनेनंतर भेदरलेल्या पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितल्यानंतर मैत्रिणींनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीच्या आईला आणि पोलिसांना शाळेत बोलावले. तिच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शाळेत दाखल झाले.
Tags
