सेक्सवर्धक गोळ्या, हळदीचं दूध अन् गळा दाबून खून!सूरत हादरलं : पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा थरारक कट

फुले शाहू आंबेडकर
0
सूरत (गुजरात) : प्रतिनिधी: एम.एस.अहिरे
लग्न, संसार आणि प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी एक अंगावर शहारे आणणारी घटना सूरतच्या लिंबायत भागात उघडकीस आली आहे. मुंबईत काम करणाऱ्या ३९ वर्षीय हैदर अलीचा मृत्यू नैसर्गिक नसून, पत्नीनेच त्याचा थंड डोक्याने काटेकोर कट रचून खून केल्याचं उघड झालं आहे. सततच्या शारीरिक व मानसिक अत्याचाराला कंटाळून पत्नी इशरत जहां उर्फ इशरत खातूनने पतीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
मुंबईत मुजरीचं काम, सूरतमध्ये अत्याचार
हैदर अली हा मुंबईत मजुरीचं काम करायचा. महिनाभर मुंबईत राहून तो सूरतमधील घरी यायचा. मात्र घरी आल्यानंतर त्याचं वर्तन अत्यंत क्रूर असायचं. चौकशीत समोर आलं आहे की, हैदर अली वारंवार सेक्सवर्धक गोळ्यांचं सेवन करायचा आणि त्यानंतर पत्नीवर जबरदस्ती करत शारीरिक व मानसिक छळ करायचा. या त्रासाने इशरत पूर्णपणे हैराण झाली होती.
प्रेमाने दिलेलं हळदीचं दूध… आतमध्ये दडलं होतं विष
पतीच्या जाचाला कंटाळून इशरतने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. १ जानेवारी २०२६ च्या रात्री तिने नेहमीप्रमाणे प्रेमाने हळदीचं दूध तयार केलं. मात्र त्या दुधात तिने उंदीर मारण्याचं विष मिसळलं होतं. सुरुवातीला विषाचा फारसा परिणाम दिसून आला नाही. काही दिवस हैदर अली जिवंतच राहिला.
प्रकृती ढासळली… रुग्णालयात दाखल
५ जानेवारीला अचानक हैदर अलीची तब्येत गंभीर बिघडली. त्याला तातडीने सूरतच्या स्मीमेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सुरुवातीला हा मृत्यू सामान्य आजारामुळे झाल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला.
दफनविधीवरून वाद अन् संशयाची ठिणगी
मृत्यूनंतर हैदर अलीचा मृतदेह घरी आणण्यात आला. त्याचा भाऊ दफनविधी बिहारमधील चंपारण येथील मूळ गावी करण्यावर ठाम होता. मात्र पत्नी इशरतने दफनविधी सूरतमध्येच होणार, असा हट्ट धरला. याच वादातून भावाच्या मनात संशयाची ठिणगी पेटली. त्याने थेट पोलिसांशी संपर्क साधला.
पोस्टमार्टम रिपोर्टने उघड केला थरार
पोलिसांनी मृतदेहाचं फॉरेन्सिक पोस्टमार्टम केलं आणि धक्कादायक सत्य समोर आलं. रिपोर्टनुसार, हैदर अलीचा मृत्यू केवळ विषामुळे झालेला नव्हता. त्याच्या गळ्यावर आणि छातीवर दाब दिल्याचे स्पष्ट पुरावे आढळून आले. श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं.
पोलिसांसमोर कबुली : “तो कमजोर झाला अन् मी…”
तपासादरम्यान पोलिसांनी इशरतला ताब्यात घेतलं. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. विषाचा परिणाम झाल्यानंतर पती कमजोर झाला होता. त्याच संधीचा फायदा घेत तिने त्याच्या गळ्यावर आणि छातीवर जोरात दाब देत त्याची हत्या केल्याचं तिने मान्य केलं.
अत्याचाराची परिसीमा गाठली होती
इशरतने सांगितलं की, पतीकडून होणारा छळ सहन करण्याच्या पलीकडे गेला होता. तो मारहाण करायचा, जबरदस्ती करायचा आणि मानसिक छळ करत राहायचा. अखेर या नरकयातनेतून सुटका मिळवण्यासाठी तिने हा टोकाचा निर्णय घेतला.
पत्नी अटकेत, तपास सुरू
पोलिसांनी इशरत जहां उर्फ इशरत खातूनला अटक केली असून तिच्याविरोधात हत्या आणि पुरावे लपवण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे सूरतसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default