रखडलेली प्रधानमंत्री घरकुल योजना

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद : प्रधानमंत्री घरकुल योजनेवरून राजकीय पटलावर आरोप- प्रत्यारोप झाल्यानंतर घाईघाईने पडेगाव व हर्सूल येथे ८६ हेक्टर जागा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आणि योजनेच्या मंजुरीसाठी आता कागदी धावपळ सुरू झाली आहे. १५ मार्चपर्यंत घरकुलाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यासाठी खासे प्रयत्न केले जात आहेत. घरकुलाचा सविस्तर प्रकल्प अहवालासाठी निविदा मागविल्या आहेत. या कामासाठी तीन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या. निविदांची तांत्रिक तपासणी पूर्ण होऊन संबंधित कंपन्यांनी बुधवारी कंपन्यांकडून सादरीकरण झाले आता वित्तीय निविदा गुरुवारी उघडल्या जाणार आहेत. केंद्र सरकारने २०१६ ते २०२२ दरम्यान शहरातील हक्काचे घर नसलेल्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वासाठी घरकुल प्रकल्पाची घोषणा केली आहे. या योजनेची मुदत मार्चअखेरी संपत असल्याने रखडलेल्या घरकुल प्रकल्पावरून एमआयएमने सत्ताधाऱ्यांना घेरले. भाजपने मग शिवसेनेवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. एका बाजूला राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना लोकसभेच्या स्थायी समितीसमोर पालिका प्रशासकांसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ घरकुल प्रकल्पासाठी तिसगावसह पडेगाव, हर्सूल येथे ८६ हेक्टरपेक्षा अधिकची जागा उपलब्ध करून दिली. लोकसभा स्थायी समितीने मार्चअखेर प्रकल्पाच्या कामाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मार्चअखेर प्रक्रिया पूर्ण केली नाही तर घरकुल प्रकल्पाचे काम पालिकेला करता येणार नाही, असेही केंद्राने बजावले. त्यामुळे पालिका प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पाला गती दिली. गुरुवारी प्राप्त निविदांपैकी वित्तीय बाबी तपासल्या जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी सांगितले.या कंपन्यांच्या निविदा प्राप्त समर्थ कन्स्ट्रक्शन, इंडो ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर, जग्वार ग्लोबल या तीन कंपन्यांनी घरकुल प्रकल्पाच्या डीपीआरसह उभारणीचे काम करण्यासाठी निविदा दाखल केल्या आहेत. प्राप्त निविदांपैकी समर्थ कन्स्ट्रक्शनने औरंगाबादेतील गंगापूर नगरपरिषदेअंतर्गत घरकुल प्रकल्पाचे काम हाती घेतलेले आहे. तर देवगड, नाशिक, नांदेड, मीरा भाइंदर पालिकांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून दिले आहे. इंडो ग्लोबल कंपनीने वणी येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम केले आहे. तर जग्वार ग्लोबलने फुलंब्री, नेवासा, परतूर येथील घरकूल योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून दिले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default