जळगाव जिल्ह्यातील पाचोरा याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. एजंटमार्फत पैसे देऊन लग्न करणं येथील एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. मध्यरात्री घडलेल्या थरारामुळे पतीसह सासू-सासरे रुग्णालयात पोहोचले आहेत.
पाचोरा, 30 मार्च: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. एजंटमार्फत पैसे देऊन लग्न करणं (Did marriage by giving money) येथील एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. 1 लाख 70 हजार रुपये देऊन लग्न केल्यानंतर नवविवाहित अल्पवयीन तरुणीनं काही दिवसांतच आपला रंग दाखवला (Marriage fraud) आहे. संबंधित तरुणीनं आपल्या वडिलांच्या मदतीनं सासरच्यांना गुंगीचं औषध देऊन घरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नवविवाहित अल्पवयीन मुलीसह तिच्या वडिलांना अटक (Accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी असणाऱ्या राहुल अर्जुन पाटील नावाच्या तरुणाचा जालना जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीसोबत विवाह झाला होता. 9 मार्च 2022 रोजी त्यांचा विवाह झाला होता. 25 मार्च रोजी नवविवाहितेला भेटण्यासाठी तिचे वडील पाचोरा याठिकाणी आले होते. याठिकाणी तीन दिवस राहिल्यानंतर लेकीला काही दिवस माहेरी घेऊन जातो, असं संशयित बापाने सासरच्या मंडळींना सांगितलं. पण त्यांनी मुलीला पाठवण्यास नकार दिला
