पिंपरी चिंचवडमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
गुरुवार, मार्च ३१, २०२२
0
मुळा नदीत एक मृतदेह आढळल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह चार ते पाच महिन्यापूर्वीचा असल्याने पूर्णतः सडला आहे. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरुन तो महिलेचा मृतदेह असल्याचे कळतेपिंपरी : हिंजवडीत मुळा नदीत चार महिन्यापूर्वीचा कुजलेल्या (Decomposed) अवस्थेतील मृतदेह (Deadbody) आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह महिलेचा असल्याचे हिंजवडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अंगावर गाऊन परिधान केल्यान तो महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंदाजे चार ते पाच महिन्यांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. प्रथमदर्शनी आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे. मात्र तसा कोणताही पुरावा तिथं आढळून येत नाहीये. त्यामुळे ही हत्या असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. (The body was found in Mula river in Pimpri Chinchwad)
हत्या की आत्महत्या ?
मुळा नदीत एक मृतदेह आढळल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह चार ते पाच महिन्यापूर्वीचा असल्याने पूर्णतः सडला आहे. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरुन तो महिलेचा मृतदेह असल्याचे कळते. ही हत्या आहे की आत्महत्या ? याबाबत हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Tags

