अभिमानस्पद! धुळ्यातील मूकबधिर वैष्णवीची गगनभरारी; ब्राझीलमधील ऑलिम्पिकसाठी झाली निवड
बुधवार, मार्च २३, २०२२
0
धुळे: दुर्दम्य ईच्छाशक्ती, धाडस आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची तयारी असेल तर या जगात काहीही अशक्य नाही असे म्हटले जाते. आपले प्रयत्न अथक असतील तर आपण कुठल्याही समस्येवर मात करून यश मिळवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे धुळे शहरातील वैष्णवी मोरे (Vaishnavi More). जन्मजात मूकबधिर असणाऱ्या वैष्णवी मोरेने आपल्या व्यंगावर मात करीत क्रीडा क्षेत्रातील घवघवीत यश संपादन केले आहे. मे महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या डेफ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून फक्त दोनच मुलींची निवड झाली असून धुळ्यातील वैष्णवी ही त्यांपैकी एक आहे. वैष्णवीच्या निवडीने धुळेकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहेब्राझील येथे होणाऱ्या २४ व्या डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत वैष्णवी बाळा मोरे हिची जुडोसाठी भारतीय संधात निवड झाली आहे. दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणीत ७० किलो वजनगटात वैष्णवीने सुवर्ण पदक जिंकून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले.वैष्णवी मोरे ही सह्याद्री जुडो अकादमी व सोलारीस येथे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या रचना धोपेश्वर यांच्याकडून जुडोचे प्रशिक्षण घेत आहे. रचना धोपेश्वर ब्लाइंड आणि डेफ मुलांना गेली अनेक वर्षे विना मोबदला जुडो चे प्रशिक्षण देत आहेत. वैष्णवी हिला सोलारीस क्लब चे संस्थापक जयंत पवार, सह्याद्री संकुलचे विजय बराटे यांचे सहकार्य लाभले आहे.
Tags

