शेतीसाठी लागणाऱ्या पावर ट्रेलर मशीनवर मिळणारी सबसीडी बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच घेणाऱ्या पाचोरा येथील कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला जळगावच्या एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पावर ट्रिलर मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. हा अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मंजूर झाला होता.
मशीन खरेदी केली असता सदर योजनेअंतर्गत मिळणारी ८५ हजार रुपयांची सबसिडी अर्जदाराच्या खात्यात जमा करण्यात येते. दरम्यान या मोबदल्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार विठ्ठल देवरेयाने दीड रुपयाची मागणी केली होती.
