आपण भारतीय जुगाड वापरून दररोज मजेदार गोष्टी तयार करण्यात हुशार आहोत. यामुळेच आपली कलाकृती पाहून मोठमोठे दिग्गज सुद्धा क्षणभर थक्क होतात. कारण आपण आपल्या जुगाडू कल्पनेने अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवली. नुकताच व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बघा. एका व्यक्तीने स्वतःसाठी कशी पद्धतीने जुगाड करत स्पेशल सीट बनवलीय.
ट्रेनमधली गर्दी याचं चित्र सर्वांनाच माहित आहे. इथल्या जनरल कोचचं सोडा, रिझर्व्हेशनच्या डब्यातही लोकांना बसायला जागा मिळत नाही… पण हल्ली समोर आलेला व्हिडीओ तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल. कारण इथं एका व्यक्तीनं आपला अतरंगी जुगाड वापरून खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये स्वतःसाठी जागा मिळवली. जर तुम्ही या समस्येत कधी अडकलात तर तुम्हाला हा जुगाड खूपच उपयोगाचा ठरू शकणार आहे. एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की ट्रेनच्या डब्यातील सर्व जागा भरल्या आहेत. हा डब्बा इतका खचाकच भरलाय की व्हिडीओमधल्या व्यक्तीला बसण्यासाठी सुद्धा जागा उरली नाही, अशा स्थितीत त्या व्यक्तीने एक जुगाड वापरून इतक्या गर्दीतही जागा मिळवलीय. या व्यक्तीने एक चादर घेतली आणि या चादरीचे एक टोक एका सीटच्या कोपऱ्याला बांधली आणि दुसरे टोक समोरच्या सीटच्या बांधले. दोन्ही सीटच्या मधोमध चादरीने जुगाड करून या पठ्ठ्याने स्वतःसाठीची स्पेशल सीट बनवली. या व्यक्तीचा जुगाड पाहून तुम्हालाही समजले असेल की आपण भारतीय जुगाडातून काहीही करू शकतो. पण कधी कधी हे जुगाड अपयशी ठरले की मात्र लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. असाच हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
