गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “फालतू लोक….”

फुले शाहू आंबेडकर
0

पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. यावेळी पोलिसांना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्जदेखील केला.

नेमकं काय झालं?

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. त्याचवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादीने उद्यानाच्या समोरच झेंडे, काळ्या भीती दाखवून भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. फडणवीस कार्यक्रमस्थळी आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर गर्दीमधून फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली. मात्र चप्पल फेकणारी व्यक्ती कोण होती हे समोर आलं नाही. भाजपा कार्यकर्त्यांकडून मोदींचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default