जुन्या निवृत्तीवेतन योजनेची काँग्रेसची मागणी

फुले शाहू आंबेडकर
0

राजस्थान आणि छत्तीसगड या काँग्रेसशासित राज्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांकरिता जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यावर दोन्ही राज्यांच्या नव्या योजनांचा राज्य सरकार अभ्यास करीत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

वाजपेयी सरकारच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन योजनेत बदल करण्यात आला होता. राज्यातही ही नवी योजना २००५ नंतर लागू करण्यात आली होती. नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन योजनेनुसारच निवृत्ती वेतन दिले जाईल.निवृत्ती नंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या हाती पुरेशी रक्कम हाती पडावी म्हणून जुनीच निवृत्ती वेतन योजना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लागू केली. यापाठोपाठ काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगड राज्यातही जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default