आर्मी अधिकारी असल्याचं सांगून 50 जणींसोबत शारिरीक संबंध; दोघींसोबत केला धक्कादायक प्रकार

फुले शाहू आंबेडकर
0
राजस्थानमधील (Rajasthan News) जयपुरमध्ये लिव-इन-रिलेशनशिपमध्ये (live in relationship) राहणाऱ्या प्रेयसीच्या मारेकऱ्याला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आलं आहे. हा दोन महिन्यांपूर्वी हत्या करून पळून गेला होता. आरोपीने यादरम्यान आणखी एका तरुणीची हत्या केली. तिला मध्य प्रदेशात घेऊन गेले आणि तेथे तिची हत्या केली आणि मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला. त्याशिवाय अलवर पोलीस गँगरेप प्रकरणात गेल्या तीन वर्षांपासून त्याचा शोध घेत होती. आरोपीने आर्मी अधिकारी असल्याचं सांगून 50 हून अधिक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. तो त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवत होतं. डीसीपी ऋचा तोमरने सांगितलं की, हत्या प्रकरणात करधनी पोलीस ठाण्यात आरोपी विक्रम उर्फ मिंटू बैरवा उर्फ पिंटू (24) याला अटक करण्यात आली आहे. तो धर्मपुरा सैंथल (दौसा) येथील राहणारा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फरार आरोपी विक्रमच्या शोधात पोलिसांनी अलवर, भिवाड़ी, दौसा, रेवाड़ी व सीकरमध्ये अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला होता. प्रेमिकाने ऐकलं नाही तर गळा दाबून केली हत्या... एडी. डीसीपी (वेस्ट) रामसिंह शेखावतने सांगितलं की, 23 फेब्रुवारी रोजी आर्मी नगर (निवारू रोड) स्थित एका खोलीत हरदोई उत्तर प्रदेश निवासी रोशनीचा मृतदेह अंथरूणावर पडलेलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारा विक्रम फरार होता. एफएशएलच्या तपासात रोशनीची हत्या करून गळा दाबल्याचं समोर आलं रोशनीच्या हत्या प्रकरणात अटक केलेला आरोपी विक्रमने सांगितलं की, रोशनीसोबत त्याची भेट मानसरोवर जयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये राहत असताना घडली होती. 50 हून अधिक मुलींना प्रेमात अडकवलं एसीपी (झोटवाड़ा) प्रमोद कुमार स्वामीने सांगितलं की, 2019 मध्ये अलवर भागात आरोपीने आपल्या मित्रांसह मिळून एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. गेल्या तीन वर्षांपासून तो फरार होता. आरोपीने चौकशीत सांगितलं की, मुंबई, चंडीगढ़, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे अनेक ठिकाणी तो काम करीत होता. यादरम्यान तो स्वत:ला आर्मी अधिकारी असल्याचं सांगत होता. पोशाखदेखील आर्मी अधिकारी असल्याप्रमाणे वागत होता. सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून तो मुलींना भेटत होता. बोलण्यात अडकवून मैत्री करीत होता. मुलींशी मैत्री करून त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवत होता. यानंतर ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जात होता. चौकशीत आरोपीने सांगितलं की, तब्बल 50 मुलींसोबत तो शारिरीक संबंध ठेवत होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default