धुळे : हत्यारांची तस्करी करणाऱ्या राजस्थान मधील तरुणास अटक

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्या जवळील एका हॉटेलजवळ हत्यारांची तस्करी करणाऱ्या राजस्थानमधील एका तरुणास पोलिस पथकाने रंगेहात पकडले आहे. या तरुणांकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुस ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून मध्य प्रदेशातून हत्यारांची तस्करी होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तालुका पोलिसांच्या पथकाने हाडाखेड तपासणी नाक्यावर सापळा लावला. यावेळी एक संशयित तरुण प्रादेशिक परिवहन सीमा तपासणी नाका जवळील विनायक हॉटेल जवळ आढळला. त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रयागसिंग देवीसिंग असे व राजस्थान राज्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता दोन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुस ताब्यात घेण्यात आले. हा शस्त्रसाठा मध्यप्रदेशातील असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default