फिर्यादीनुसार, गायकवाड हे आजारी असल्याने कामावर न जाता घरी एकटेच होते. त्यांच्या पत्नी कामावरून घरी परतल्यावर पतीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या बेडरूममध्ये गेल्या असता, त्यांना त्यांचे पती हे सिलिंग हूकला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली आहे
नाशिक : पंचवटीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
शुक्रवार, एप्रिल ०८, २०२२
0
मखमलाबाद नाका परिसरातील मधुबन कॉलनीतील एका व्यक्तीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजू हरिभाऊ गायकवाड (४८, रा. द्रोणागिरी रो-हाउस रूम नं 81, मधुबन कॉलनी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत राजू गायकवाड (२०) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Tags
