अतुल यांना या रकमेची वेळेत परतफेड करता आली नाही. त्यामुळे सुवर्णा हिने अतुल यांनी दिलेले धनादेश बँकेत टाकले होते. रेखा पाटील हिने यामध्ये मध्यस्थी केली. न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले; पण सुनावणीला
सुवर्णा पाटील उपस्थित राहिली नाही. त्यामुळे अतुल तणावात होते. पैशासाठी तगादा वाढू लागल्याने अतुल यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली होती. यामध्ये सुवर्णा पाटील व रेखा पाटील यांची नावे होती.
आत्महत्येस कारणीभूत तसेच सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत या दोघींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अटकेच्या भीतीने दोघी पसार झाल्या. पण गुरुवारी सुवर्णा पाटील हिला अटक करण्यात पोलिसांना यश आले. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रेखा पाटील हिचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
