जामिनावर बाहेर येताच कुख्यात गुन्हेगाराला भररस्त्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण, औरंगाबादमधील घटना

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद, 28 एप्रिल : ऐतिहासिक नगरी असलेल्या औरंगाबाद (aurangabad ) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. जामिनावर बाहेर आलेल्या एका कुख्यात गुंडाला भर रस्त्यावर लोखंडी रॉड आणि दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात गुन्हेगार प्रविण साबळे उर्फ पऱ्या हा जामिनावर सुटून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर चार ते पाच जणांनी भर रस्त्यावर त्याच्यावर हल्ला केला. दुचाकीचे शॉकअप रॉड, दांड्याने त्याला बेदम मारहाण केली. यात डॉ.आंबेडकर चौकात तो कितीतरी वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. बुधवारी दुपारी आंबेडकर चौकात ही घटना घडली. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुख्यात गुंड पऱ्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर बाहेर येताच त्याने लुटमार केली. त्न्यात त्याची जामिनावर सुटका केली. बुधवारी तो पुन्हा आंबेडकरनगरमध्ये जाताच जुन्या वादातून चार ते पाच जणांनी त्याला बेदम मारहाण सुरू केली. यात तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याला तसेच सोडून पळ काढला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात तो रस्त्यावर विव्हळत होता. लोकांनी एकच गर्दी झाली होती. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती कळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पऱ्या बेशुद्ध असून घाटीत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default