सुरत (कडोदरा चाररस्ता) येथील पाटील कुटुंबाने मंदिरात लग्न (Marriage) लागल्यानंतर कोर्टांत रजिस्टर नोंदणी केली. परंपरेनुसार कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी जात असताना कुसुंबा बसस्टँडजवळील रवींद्र रेस्टॉरंटवर अल्पोपहारासाठी गाडी थांबविली. नववधूने रेस्टाँरटंवर मला झोप लागल असून, मी गाडीत जाऊन झोपते असे सांगितले.
गाडीजवळ आल्यानंतर बसला धक्का
नातेवाईकांनीही तिला गाडीत जाण्यास सांगितले. परंतु काही वेळानंतर पाटील कुटुंब गाडीजवळ आले असता नववधू गाडीत दिसली नाही. पाटील कुटुंबाने शोध घेतला असता नववधू मिळून आली नाही. यानंतर पाटील कुटुंबाने धुळे तालुका पोलिस (Police) ठाणे गाठत सर्व प्रकार कथित केला. मुलाच्या आईला विचारले असता सदर विवाह एजंटमार्फत दोन लाख रूपये देऊन झाला आहे. एक लाख लग्नाला खर्च आला व तिच्याजवळ एक लाख रुपये दिले होते. अंगावर एक तोळा सोने, पायात पैंजनही घेऊन दिल्या होत्या. हे सर्व घेऊन नववधू पसार झाली.
