बीड : लग्नाच्या आठ दिवसानंतर नवरी भुर्रर्र

फुले शाहू आंबेडकर
0
गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या मुलाला रामकिसन जगन्नाथ तापडीया यांनी औरंगाबाद येथील एका मुलीचे स्थळ आणले. नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी दोन लाख देत असाल तर लग्नास सहमती देवू असे सांगितले. त्यानुसार नवरीकडील मंडळींना रोख 60 हजार व 1 लाख 40 हजाराचा धनादेश दिल्यानंतर बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात 20 जुलै 2021 रोजी लग्न समारंभ पार पडला. दरम्‍यान, दाेन लाख घेतल्यानंतर नवरीसह तिच्या नातेवाईकांनी लग्नाला होकार दिला. यानंतर मुलाकडील मंडळीने स्वखर्चाने थाटात लग्न पार पाडले. मात्र लग्नाच्या आठ दिवसानंतर नवरी मुलगी माहेरी म्हणून गेली. नंतर ती परत आलीच नाही. आणि सदरील नवरी मुलीचा मोबाईल काही दिवसांनी बंद झाला. या घटनेनंतर तिचा यापूर्वी विवाह झालेला असून तिला दोन अपत्य असल्याचे माहीती मुलाकडील मंडळींना समजली. तिचा आठ वर्षापूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला असून त्यांना दोन अपत्य देखील असल्याचे नवरदेव मंडळींना समजले. त्‍यावेळी त्यांना माेठा धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचे स्थळ आणलेले रामकिसन जगन्नाथ तापी या यांना संपर्क साधला. त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगितले. नवर्याकडील मंडळींना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नवरदेवच्या फिर्यादीवरून नवरी मुलीसह संतोष विश्वनाथ शिंदे, सुनिता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी , रामकिसन जगन्नाथ तापडिया व विठ्ठल किसन पवार यांचेवर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default