सांगली : जत तालुक्यात महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

फुले शाहू आंबेडकर
0
जाडरबोबलाद (ता.जत) येथे एका महाविद्यालयीन तरूणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनी सिद्धाप्पा बिज्जरगी (वय १७) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.१९) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, अश्विनी ही इयत्ता अकरावीच्या वर्गात विज्ञान शाखेतून शिक्षण घेत होती. दरम्यान मंगळवारी दुपारी दुसऱ्या खोलीत अभ्यासाला जाते म्हणून सांगून दरवाज्याला आतून कडी लावून घेतली. यानंतर स्वतःच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. घरातल्या व्यक्तींनी अश्विनीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तत्पुर्वीच अश्विनीचा मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती उमदी पोलिसांना दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default