जिनिंगच्या एका भागातून आज अचानक धूर निघत असल्याची बाब निदर्शनास आली. काही वेळातच या भागांमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यामुळे कर्मचार्यांनी तातडीने ही माहिती कारखान्याच्या प्रशासनाला दिली. यानंतर दोंडाईचा येथील अग्निशमन दलाचे बंब तातडीने आग लागलेल्या ठिकाणी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने तोपर्यंत भीषण रूप धारण केले होते. त्यामुळे नजीकच्या तालुक्यामधील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
त्यानंतर दुपारी उशिरा ही आग नियंत्रणात आली
मात्र, तोपर्यंत कारखान्यात असलेली यंत्रसामग्री आणि गोदामात ठेवण्यात आलेल्या सरकीचा साठा जळून खाक झाला होता. या आगीमध्ये सुमारे पन्नास लाखाचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भामरे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
