मिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार, संबधित पोलीस अधिकाऱ्याच्या घराच्या मागे असलेल्या मस्जिदीत नमाज पठण सुरू होते. त्यावेळी या अधिकाऱ्याने मस्जिदीच्या दिशेने मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणे लावले. एका जबाबदार अधिकाऱ्याने केलेली ही कृती भयंकर होती. यातून 2 धर्मात तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.
संबधित पोलीस अधिकारी हे रेल्वे सुरक्षा दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. एका जबाबदार पदावर असून सुद्धा त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचा आदेश क्र.जा क्र विशा-४/आदेश/औ बाद/ २०२२-१५७५ औरंगाबाद दि. २२/०४/२०२२ अन्वये प्राप्त आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) चे उल्लंघन केले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.
