या अपघातील संदेश पवार (वय 13), अभिषेक मुकणे (वय 25), गुलाब भोये (वय 56) , संगीता भोये (वय 54), अनिता थोरात (वय 39), सरिता भवर (वय 26) , बाळू भडांगे (वय 55), मीना गावीत (वय 53), संगीता पवार (वय 38), आशिष पवार (वय 07), बाळू पवार (वय 50), मैना वाडू (वय 67), ईश्वर सहारे (वय 19), सुरेश भोये (वय 56) अशी जखमीची नावे आहेत.
नवरी मुलीच्या लग्नासाठी वऱ्हाड तानसा येथून शेजारच्याच गावात निघाले होते. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो जवळ जवळ पलटी होऊन हा अपघात झाला. या भीषण अपघातात टेम्पो मधील वऱ्हाडी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना खासगी वाहन आणि रुग्ण वाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु यामधील १४ पैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
