Chinese Loan App : कर्ज देण्याच्या आमिषाने चायनीज लोन अॅपद्वारे भारतीय लोकांना फसवणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम युनिटने (IFSO) पर्दाफाश केला आहे.
Chinese Loan App : चायनीज लोन अॅपद्वारे भारतीय लोकांना फसवणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम युनिटने (IFSO) पर्दाफाश केला आहे. या टोळ्या कर्जदारांना बदनामी करण्याच्या नावाखाली धमकावत असत. पोलिसांनी या टोळीतील आठ जणांना अटक केली असून ते सर्व भारतीय आहेत. धक्कादाय म्हणजे हे सर्व आरोपी चिनी टोळीसाठी काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे. चीनमधील या टोळीचा मास्टरमाइंड एक चायनीज असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.
आईएफएसओ के डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, चीन, हाँगकाँग आणि दुबई येथून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या भारतीय नेत्यासह आठ सदस्यांना देशाच्या विविध भागातून अटक करण्यात आली आहे. या टोळीने भारतीय लोकांकडून फसवणूक आणि खंडणीच्या माध्यमातून अनेक कोटी रुपये उकळले आहेत. त्यानंतर क्रिप्टोकरन्सीद्वारे चिनी लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक तपासाअंती ही टोळी लोन अॅपद्वारे लोकांच्या मोबाईलमध्ये मालवेअर सॉफ्टवेअर बसवत असल्याचे निष्पन्न झाले असून त्याद्वारे त्यांचा वैयक्तिक डेटा एक्सेस केला जाऊ शकतो. त्यानंतर कर्जाची रक्कम परत मागण्याच्या नावाखाली लोकांना त्रास दिला जात असे. तो त्यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोद्वारे गोळा करण्यात येत असे.
अटक करण्यात आलेल्या आठ जणांकडून 25 पेक्षा जास्त बँक खातीही पोलिसांनी गोठवली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 16 डेबिट कार्ड, 22 चेकबुक आणि 26 पासपोर्ट जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या खात्यांमध्ये 11 लाख रुपये मिळाले आहेत.
