डोंबिवली येथे विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा प्रशिक्षक गजाआड

फुले शाहू आंबेडकर
0
विद्यार्थिनी बरोबर प्रेम संबंध प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका क्रीडा प्रशिक्षकावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मानपाडा पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली आहे. रामेश्वर पाठक (31) असे अटक करण्यात आलेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे.
मिळालेली माहीती अशी की, डोंबिवली येथे राहणारी 27 वर्षीय पीडित तरुणी, 2012 साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. त्यावेळी तिचे कोच असलेल्या रामेश्वर पाठक याने पीडित तरुणीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. या दोघांमधले नातेसंबंध व्यवस्थित सुरु असताना 2019 नंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले. पीडित तरुणी दुसऱ्या मुलांशी बोलते म्हणून रामेश्वर तिला मारहाण करायला लागला.
18 मार्च 2022 रोजी रामेश्वरने अशाच एका कारणावरुन लोखंडी रॉडने पीडित मुलीला अमानुष मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याने तरुणीवर शारिरिक अत्याचार करत अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. यानंतर तरुणीने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने मानपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी रामेश्वर पाठकविरोधात बलात्कार, गंभीर मारहाण आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default