या संदर्भातील माहिती अशी की, शहरातील खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला (आरजे ०९ जीसी २५९७ ) या क्रमांकाच्या कंटेनरवरील चालकाने गाडी रिव्हर्समध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज आला नाही. कंटेनर सरळ डीपीवर आदळला. विजेचा तीव्र धक्का लागून चालकाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परिसरातील नागरिकांनी चालकाचा मृतदेह केबिनच्या बाहेर काढला.
जळगाव : डीपीला कंटेनरची धडक, विजेच्या धक्क्याने चालकाचा जागीच मृत्यू
रविवार, एप्रिल १७, २०२२
0
रिव्हर्स घेताना अंदाज न आल्याने कंटेनर विद्युत डीपीला धडकला. कंटेनरमध्ये विदयुत प्रवाह उतरल्याने विजेच्या धक्क्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना आज (शनिवार) सकाळी ९ च्या सुमारास शहरातील खेडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ घडली.
Tags
