हल्ल्यात जखमी झालेल्या संजय बियाणी आणि त्यांच्या चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबाराच्या या घटनेने शहरात तणावाचे वातावरण आहे. संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे प्रस्थ असून खंडणी वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नांदेड हादरले! बांधकाम व्यावसायिकावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार, चालकही गंभीर जखमी
मंगळवार, एप्रिल ०५, २०२२
0
नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी ( Sanjay Biyani Nanded ) यांच्यावर त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले आहे. जखमी झालेल्या दोघांवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा गोळीबार कुणी केला याचा पोलीस घटनास्थळी येऊन शोध घेतायत
Tags
