“स्वच्छ भारत मिशन” ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांशी योजना असून गाव हगणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार वैयक्तिक शौचालयाच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून बारा हजार रुपये देते. याच योजनेत मोठा भ्रष्ट्राचार झाला आहे.
यामध्ये गट समन्वय समाधान निंभोरे यांनी ओळखीच्या लोकांच्या खात्यावर स्वच्छ भारत मिशनच्या खात्यावरुन १ कोटी ५१ लाख ६१ हजार ५३३ वर्ग केल्याचा आरोप आहे. तसेच स्वत:च्या खात्यावर १२ हजार प्रमाणे ३३ वेळा ६ लाख ४ हजार ४७७ रुपये वर्ग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच समूह समन्वयक मंजुश्री पवार यांनी१२ हजार रुपये प्रमाणे ३५ ओळखीच्या लाभार्थीच्या नावे ४ लाख २० हजार वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच बीडीओ यांच्या खोट्या स्वाक्ष-यांच्या याद्या बँकेला दिल्या आहे.
