विक्रेत्याकडे शेवटचे दोन डझन केळी शिल्लक होती ती अजहर खान याने खरेदी केली.
जळगाव, 02 मे : केळी (banana) विकत घेतल्याच्या कारणावरून दोन जणांवर चाकूने वार (knife attack) करून जखमी केल्याची धक्कादायक घटना जळगावातील (jalgaon) मास्टर कॉलनी घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अक्सा नगर येथे अजहर खान इक्बाल खान हा तरुण अजहर खान व त्याचा मित्र अशरफ खान हे दोघे मास्टर कॉलनीतील चटोरी गल्लीत केळी घेण्यासाठी गेले होते. विक्रेत्यांकडे शेवटचे दोन डझन केळी शिल्लक होती ती अजहर खान याने खरेदी केली.
त्याच वेळी आरोपी दानिश पिरजादे, पप्पू पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकीम पिरजादे आणि रहीम पिरजादे यांनी केळी घेण्यासाठी आले हते. त्यावेळी आम्ही केळी घेतल्याचा दावा केला. त्यामुळे दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. काही वेळातच शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर दानिश पिरजादे याने खिशातून चाकू काढून अशरफ खान आणि अजहर खान यांच्यावर वार करून जखमी केले. चाकूने वार केल्यानंतर तिघेही घटनास्थळावरून फरार झाले. जखमी झालेल्या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अजहर खान यांच्या फिर्यादिवरून संशयित आरोपी दानिश पिरजादे, पप्पू पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकीम पिरजादे, रहीम पिरजादे यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना जिल्हाबंदीचे आदेश
दरम्यान, अक्षय तृतीया , रमजान ईद आणि परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एमआयडीसी पोलीस हद्दीतील दोन गुन्हेगारांना जिल्हा न्यायालयाने १५ दिवसांसाठी जिल्हाबंदी करण्याचे आदेश सोमवारी दिले. जिल्ह्यात अक्षय तृतीया, रमजान ईद व परशूराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण व मयुर देविदास बागडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
यातील दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याच्यावर हाणामारी, घरफोडी, जबरी चोरी असे १५ गुन्हे दाखल आहेत तर मयुर देविदास बागडे याच्यावर मारामारी, चोरी व अवैध दारू सोबत बाळगणे असे ५ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालयाने दोघांना 15 दिवसांसाठी जिल्हाबंदीचे आदेश दिले आहे.
