डूंगरपूर : राजस्थानात (Rajasthan) एका तरुणीने एक नाही दोन नाही तर तब्बल ३० जणांसोबत लग्न करुन त्यांना मूर्ख बनविले आहे. ३१ वे लग्न (Marriage) करताना हा फसवणूकीचा (Fraud) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिला डूंगरपूर जिल्ह्यातील (district) सागवाडा पोलिसांनी (
police) तरुणीला अटक (Arrested) केली आहे. तिला जबलपूर येथून अटक करण्यात आली. एका वर्षाआधी लग्नाच्या नावावर ५ लाख रुपये घेऊन पळाली होती. याचप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. यानंतर चौकशीत तिने ३० लग्न केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.
सागवाडा पोलीस (
police) निरीक्षक सुरेंद्र सिंह सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार की, १२ डिसेंबर २०२१ ला जोधपुर येथील रहिवासी प्रकाशचंद्र भट्ट यांनी तक्रार दाखल केली होती. भट्ट यांनी सांगितले की, जुलै २०२१ मध्ये एजंट परेश जैन याने मध्यप्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी तरुणी सोबत त्याचे लग्न लावून दिले होते. याबदल्यात रमेश आणि तरुणीने त्याच्याकडून ५ लाख रुपये घेतले होते. यानंतर लग्नानंतर ७ दिवस सासरी राहिल्यानंतर तरुणीने त्याच्यासोबत जबलपूर येथे गेली. परत येताना तरुणीने दुसऱ्या लोकांना सोबत घेऊन त्याला मारहाण केली आणि आपल्या साथीदारांसह ती पळून गेली होती. यानंतर परेश जैन आणि तरुणीने आपले फोन नंबर बंद करून ठेवले. तसेच त्याचे पैसे देखील दिले नाही
पोलीस तपासाच्या दरम्यान असे आढळून आले की, ती जबलपूर येथे स्वतः चे नाव बदलून काम करत आहे. तरुणीने लुटारू नववधूंची टोळी चालवली आहे. तिने काही मुलींची बनावट नावं, पत्त्यासह आधारकार्ड आणि अन्य कागदपत्र तयार करुन ठेवले आहे. अनेक राज्यात ती एजंटच्या माध्यमातून बनावट लग्न करवून त्यांच्याकडून पैसे आणि सोने, चांदीचे दागिने घेत होती. त्यानंतर ती फरार होत होती. तिच्या सोबतीला आजून एका तरुणीचा समावेश आहे. ती देखील अधिक काळापासून तिच्यासोबत राहत होती.
पोलिसांनी तपासादरम्यान, तरुणीचा नंबर काढला. यानंतर कॉन्स्टेबल भानुप्रतापने आपला फोटो पाठवून लग्न करण्याबाबत तिला सांगितले. लग्नासाठी मुलगी दाखवायला ५ हजार रुपये मागण्यात आले. त्यानंतर तरुणीने कॉन्स्टेबलला ८ ते १० मुलींचे फोटो पाठवले. त्यात आरोपी तरुणीचा देखील फोटो होता. पोलिसांनी तरुणीला लगेचच ओळखले. यानंतर एक सापळा रचत आरोपी तरुणी पसंत असल्याचे सांगत तिच्यासोबत लग्न करण्याचे सांगितले .
तरुणीने कॉन्स्टेबलला समदडिया मॉलजवळ अॅडव्हान्स मध्ये ५० हजार रुपये घेण्याबाबत सांगितले.
यानंतर कॉन्स्टेबल भानुप्रताप हे वर बनले आणि त्याच्यासोबत कॉन्स्टेबल भूपेंद्र सिंह आणि वीरेंद्र सिंह त्याचे मित्र बनून गेले. तिकडे तरुणी पसंद केलेली तरुणीला घेऊन आली. तिथे तिने तिचे नाव दुसरे असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांना इशारा मिळताच महिला पोलीस पथकही तिथे पोहोचले. यानंतर पोलिसांनी तरुणीला आणि तिच्या साथीदार तरुणीला अटक केली आहे. आतापर्यंत तिने ३० लग्न केल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.