302 जणांवर गुन्हा दाखल झालेल्या गावातील वाद रावसाहेब दानवेंनी मिटवला!

फुले शाहू आंबेडकर
0

 जालना: गावातील प्रवेशद्वाराला नाव देण्याच्या वादातून जालन्यातील चांदई एकको गावात 12 मे रोजी दोन गटात राडा झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी 302 जणांवर गुन्हे दाखल केले असून काही जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या गावात झालेल्या राड्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज चांदई एक्को गावात जाऊन दोन्हीही गटाशी चर्चा करून हा वाद मिटवला आहे. यापुढे चांदई एक्को गावात पूर्वीप्रमाणेच शांतता राहणार असून गावात पोलिसांकडून लावण्यात आलेली संचारबंदी हटवण्यात यावी, अशी विनंती पोलीस प्रशासनाला करणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे.

दरम्यान भोकरदन तालुक्यातील चांदइ एकको गावात छत्रपती शिवाजी महाराज


 यांच्या पुतळा काढण्यावरून वाद झाला होता. दोन गटात पुतळा काढण्यावरुन हा वाद झाला होता. पुतळा काढण्यासाठी आलेल्या जेसीबी वर दगडफेक करण्यात आली होती. गावाच्या वेशील स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्यावे म्हणून दोन्ही गटात वाद झाला.

एका गटाकडून गोपीनाथ मुंडे यांच नाव देण्यास विरोध करण्यात येत होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नाव कायम ठेवावं अशी मागणी एका गटाने केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यासाठी आलेल्या जेसीबी व क्रेन वर ग्रामस्थांकडून दगडफेक करण्यात आली होती. वाद विकोपाला गेल्यानंतर पोलीसांनी गोळीबार केला होता यात १० जण जखमी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default