पत्नीशी अनैसर्गिक संबध; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा

फुले शाहू आंबेडकर
0
बारामती: बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या २७ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यावर त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली, त्यानुसार या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचा विवाह ३१ मार्च २०१८ रोजी आळंदी येथे झाला. त्यांना एक मुलगा आहे. लग्न झाल्यापासून तक्रारदार महिलेला पतीने कधीही मूळगावी नेले नाही. तसेच छोट्या-मोठ्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. हे लग्न होण्यापूर्वी सुद्धा त्याचे पहिले लग्न झाल्याची माहिती तक्रारदार महिलेला समजली. याबाबत तक्रारदार महिलेने पतीला विचारणा केल्यावर तिला दमदाटी केली. तसेच तक्रारदार पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच तिच्या व मुलाच्या नावाची कोणतीही कागदपत्रे अद्याप काढलेली नाहीत, अशी फिर्याद देण्यात आली आहे.
या प्रकारची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यावर ४९८ अ, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने पुरवणी जबाब दिल्याने भादवि कलम ३७७ नुसार कलम वाढ करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default