यावल येथे लग्‍नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

फुले शाहू आंबेडकर
0
यावल (जळगाव) : येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला शहरातील एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्याकडून पैसे देखील उकळले. याप्रकरणी जळगाव (Jalgaon) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यावल (Yawal) येथील विशाल राजेश तडवी (वय २३) या तरुणाने जळगावात महाविद्यालय शिक्षण घेत असलेल्या यावलमधील एका विद्यार्थिनीशी ओळख निर्माण केली. तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. यासाठी तरुणाने जळगाव शहरातील संभाजीनगरात भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतला होता. त्यात २८ ऑक्टोबर २०१८ ते आजतागायत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्याकडे पैशाची मागणी केली

पैसे देण्यास नकार दिल्‍याने जीवे मारण्याची धमकी

तरुणीने पैसे देण्यास नकार दिला असता तिला शिवीगाळ करून मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या पीडित तरुणीने जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिस (Police) ठाण्यात गुरुवारी (ता. ५) फिर्याद देऊन या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default