शहरातील एक इसम आपल्यासोबत अग्निशस्त्र बाळगून असल्याची गुप्त माहितीदारामार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित इसमाचा शोध घेतला असता तो शहरातील दंडेवाले बाबानगर या ठिकाणी पोलिसांना आढळून आला. त्याला पोलिसांनी अग्निशस्त्र संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली.
संबंधितावर यापुर्वीही गुन्हे
संबंधिताने अग्निशस्त्र लपवून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना दिली व अग्निशस्त्र लपवून ठेवलेल्या ठिकाणाची माहिती देखील दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अग्निशस्त्र व जिवंत कारतुस हस्तगत केले आहे. यासंदर्भात मोहाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितावर यापूर्वी देखील शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे यापूर्वीच दाखल असल्याची देखील माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
