वेशांतर करत पोलिसांची पायपीट
१७ मेस पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली की शहादा, म्हसावद व सारंगखेडा परीसरातील दुकानांचे शटर उचकावून चोरी करणारी टोळी ही बडवानी जिल्ह्यातील कालाखेत व धार जिल्ह्यातील डोंगराळ भागातील आहे. एलसीबीला ही माहिती दिली. तात्काळ एक पथक तयार करुन पथक मध्यप्रदेश येथे गेले. पथकाने पाटी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोकराटा, आमली, कालाखेत, गोलपाटीबैडी आदी गावांच्या पाड्या पाड्यांवर स्थानिक पोलीसांच्या मदतीने जावून ३ ते ४ दिवस मुक्काम केला. वेषांतर करून फिरले. १६ कि.मी. पायपीट करीत न्हावड्या फळी, बोकराटा येथील संशयीतांच्या घरी अचानक छापा टाकुन त्यांना ताब्यात घेतले. त्यात तुकाराम मास्तरीया वास्कले (वय २४), संना रामसिंग वास्कले (वय ४४), समदर रामसिंग वास्कले (सर्व रा . मु . न्हावड्या फळी) यांचा समावेश आहे.
गुन्ह्याची कबुली
तुकाराम वास्कले याचे वडील बडवानी जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असतांना संना व समदार यांची ओळख मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील नवलसिंग, धरमसिंग, नोरद्या, रायसिंग यांच्याशी झाली. कालांतराने तुकाराम वास्कले यांचे वडील शिक्षा पूर्ण भोगून घरी आल्यानंतर हे समदर वास्कले यांच्या मदतीने मागील ९ ते १० महिन्यात त्यांनी शहादा, म्हसावद, सारंगखेडा हद्दीतील छोट्या छोट्या गावांमध्ये शटर उचकावून चोरी व मोटर सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
